13 AdBlock Extensions for Chrome: Ad-Free Companions
Home » विधानसभा निवडणूक » उत्तर प्रदेशात योगी मजबूत, ममतांचा किल्ला अभेद्य: ‘मप्र’त मंत्री पराभूत, 13 राज्यांतील 46 पैकी 26 जागा एनडीएकडे

उत्तर प्रदेशात योगी मजबूत, ममतांचा किल्ला अभेद्य: ‘मप्र’त मंत्री पराभूत, 13 राज्यांतील 46 पैकी 26 जागा एनडीएकडे

  • Marathi News
  • National
  • Yogi Strong In Uttar Pradesh, Mamata’s Citadel Impregnable; MP Lost, 26 Out Of 46 Seats In 13 States To NDA

नवी दिल्ली8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

१३ राज्यांतील ४६ विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत बहुतांश ठिकाणी सत्ताधारी पक्षांचे वर्चस्व राहिले. एनडीएने २६ जागा जिंकल्या. ९ जागांचा फायदा झाला. काँग्रेसने ७ जागा जिंकल्या, पण ६ गमावल्या. लोकसभेच्या दोन जागांवरही पोटनिवडणूक झाली. केरळच्या वायनाडमधून ४.१० लाख मतांनी विजयी होऊन प्रियंका गांधी पहिल्यांदा लोकसभेत पोहोचल्या. महाराष्ट्रात नांदेडच्या जागेवर रवींद्र चव्हाण यांनी भाजपचे संतुकराव हंबर्डेंचा १४५७ मतांनी पराभव केला. यापूर्वीही दोन्ही जागा काँग्रेसकडे होत्या.

म.प्र.तील विजयपूरमध्ये वनमंत्री रामनिवास रावत यांचा काँग्रेस उमेदवाराने पराभव केला. ते लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाऊन मोहन यादव सरकारमध्ये मंत्री बनले. यूपीमध्ये भाजपने ९ पैकी ७ जागा जिंकल्या, तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने सर्व ६ जागा जिंकल्या. कर्नाटकात काँग्रेसने तीनही जागा जिंकल्या. पंजाबमधील सत्ताधारी आपने काँग्रेसकडून ३ जागा हिसकाल्या, पण स्वतःची एक जागा गमावली. राजस्थानात भाजपने ७ पैकी ५ जागा जिंकल्या. एक काँग्रेसला व एक भारत आदिवासी पक्षाला मिळाली. काँग्रेसला ३ जागांचा फटका बसला. बिहारला सत्ताधारी एनडीएने ४ जागा जिंकल्या. एनडीएने इमामगंज जागा वाचवत इंडियाकडून ३ जागा हिसकाल्या.

यूपी : भाजपने ७ जिंकल्या, सपाने ३ गमावल्या

नऊ जागांपैकी भाजप ७ वर विजयी. ६०% मुस्लिम लोकसंख्या असलेल्या कुंदरकीमध्ये ३२ वर्षांनंतर भाजपने विजय मिळवला. भाजपच्या रामवीर सिंगांनी सपाच्या मोहंमद यांचा पराभव केला. रिझवान यांचा १.६३ लाख मतांनी पराभव केला. येथे मुस्लिम जातींमध्ये विभागले गेले. भाजप-आरएलडीने गाझियाबाद, मीरापूर, खैर, कुंदरकी, कटहारी, मांझवा व फुलपूर या जागा जिंकल्या. सपाने करहल व सिसामऊ जिंकले.

राजस्थान : भाजपच्या आणखी ४ जागा वाढल्या

राजस्थानमध्ये ७ जागांवर पोटनिवडणूक झाली. आधी ४ जागा काँग्रेसकडे व प्रत्येकी एक जागा भाजप, बीएपी व आरएलपीएकडे होती. भाजपने ५ जागा तर एका जागेवर काँग्रेस व एका जागेवर बीएपीने विजय मिळवला. काँग्रेसच्या ३ जागा घटल्या. भाजपच्या ४ वाढल्या. आरएलपीएलने एकमेव जागा गमावली.

पंजाब : आपने काँग्रेसच्या ३ जागा हिसकावल्या

४ जागांवर पोटनिवडणूक झाली. सत्ताधारी ‘आप’ने चब्बेवाल, डेरा बाबा नानक व गिद्दरबाहा काँग्रेसकडून हिसकावून घेतल्या. बरनाला जागा काँग्रेसने गमावली.

वायनाड : प्रियंका विजयी

प्रियंका गांधी यांनी केरळमधील वायनाड येथे पहिली निवडणूक ४.१० लाख मतांनी जिंकली. राहुल गांधी वायनाड व रायबरेलीमधून निवडून आले होते.

छत्तीसगड व गुजरातमधील प्रत्येकी एका जागेच्या पोटनिवडणुकीत भाजप विजयी. केदारनाथची जागा भाजपने जिंकली. मेघालयातील १ जागा एनपीपीच्या ताब्यात राहिली. सिक्कीमच्या दोन जागांवर सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *